6
तुच सुखकर्ता तुच दु:खहर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षाने एकदाच हर्ष गोड अन्‍नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा जाणुनी हा परामर्श पुर्‍या वर्षाची, सार्‍या दु:खाची, वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा पहा आली कशी आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ गुळ-फुटाणे-खोबरं नि केळ, सार्‍या प्रसादाची केली भेळ कर भक्षण आणि रक्षण, तूच पिता अन्‌ तूच माता बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे हाल ओळख सार्‍या घरांचे, कधी येतील दिवस सुखाचे? सेवा जाणुनी, गोड मानुनी, द्यावा आशीर्वाद आता बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा
संचित नयनरेखा ठेवण्यासाठी जागा सोडली आहे.

aarti-view/[slug]

version 1.0.0.